
Table of Contents
Toggleलाडकी बहिण योजना
लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली लोकप्रिय योजना आहे.या योजनेनुसार पात्र महिलांना दर महिन्याला 1500 इतकी रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते आर्थिकदृष्ट्या गरीब आणि निराधार महिलांना मदत करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. सुरुवातीला या योजनेमधून अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला होता, पण त्यानंतर अर्जाची पडताळणी केल्यावर लक्षात आलं की लाखो महिला यामध्ये अपात्र आहेत.
लाडकी बहीण या योजनेनुसार आत्तापर्यंत 1500 रुपयांप्रमाणे तेरा हफ्ते देण्यात आलेले आहेत. आता या योजनेची अर्जाची पडताळणी चालू आहे त्यामध्ये किती महिला पात्र आहेत किंवा किती महिलांना यापुढे लाभ मिळेल हे ठरवण्यात येणार आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
तपशील | माहिती |
---|---|
सुरूवात करणारे | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण | राज्यातील गरीब महिला |
उद्देश | गरीब आणि निराधार महिलांना आर्थिक मदत करणे |
योजनेचा लाभ | दर महिन्याला ₹1500 रुपये थेट बँक खात्यावर जमा होतात |
पात्रता | महाराष्ट्रात रहिवासी असणे, वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे, महिला असणे |
योजनेची सुरुवात | 1 जुलै 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | ladkibahin.maharashtra.gov.in |
लाडकी बहिण योजना KYC का होणार?
अर्जाची पडताळणी करण्यासाठी सरकार KYC प्रक्रियेचा वापर करणार आहे. तुम्हाला जर यापुढे लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
KYC द्वारे सरकार तुमची ओळख त्याचबरोबर खात्रीशीर माहिती पडताळून घेणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला यापुढे माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तुम्ही जर KYC मध्ये अपात्र ठरला, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
आता पण जाणून घेऊयात KYC करणे का गरजेचे आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, त्याचबरोबर KYC प्रक्रिया कशी करायची.
KYC का आवश्यक आहे?
सरकारची होणारी फसवणूक टाळण्यासाठी: काही महिला खोटी माहिती देऊन योजना घेत आहेत, तर ते थांबवण्यासाठी KYC करणे गरजेचे आहे.
योग्य लाभार्थी निवडण्यासाठी: केवळ पात्र महिलांनाच योजना मिळावी म्हणून KYC गरजेची आहे.
आधार लिंक व्हेरिफिकेशन: KYC दरम्यान आधार आणि बँक खाते जोडलेले असते, ज्यामुळे पैसे थेट खात्यात ट्रान्सफर करता येतात.
अचूक माहिती ठेवण्यासाठी: लाभार्थ्यांची माहिती सुरक्षित आणि अचूक ठेवण्यासाठी सरकार KYC आवश्यक करते.
KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
लाडकी बहिण योजनेची KYC करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली कागदपत्रे लागतील.
1. आधार कार्ड( तुमचे आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे)
2. ज्या बँकेत तुम्ही लाभ घेत आहात त्या बँकेचे पासबुक
3. पासपोर्ट साईज फोटो
4. रहिवासी पुरावा
KYC कशी करावी?
लाडकी बहिण योजनेची KYC तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन करू शकता.
ऑनलाइन KYC प्रक्रिया
ladkibahin.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही KYC करु शकता.
लाडकी बहिण योजनेची KYC करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
1. KYC करताना तुमचे आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे गरजेचे आहे.
2. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत.
3. स्पष्ट फोटोसह योग्य कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
KYC प्रक्रिया सुरू होण्याची तारीख
अजून KYC करण्यासाठी तारीख आलेली नाही. तारीख आल्यानंतर ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही KYC करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र.1: KYC करण्यासाठी कोणते कागदपत्र गरजेचे आहेत?
उ: रहिवासी पुरावा, मोबाईलशी लिंक असलेले आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो.
प्र.2: KYC नाही केली तर काय होईल?
उ: तुम्हाला या योजनेपासून अपात्र ठरवले जाईल आणि योजनेचा लाभ घेता येणार नाही.
प्र.3: KYC करण्यासाठी पैसे द्यावे लागतील का?
उ: नाही,KYC प्रक्रियेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.