संजय गांधी निराधार योजना 2025- सरकारची घोषणा, आता मिळणार 2500 रुपये महिना

संजय गांधी निराधार योजना 2025

महाराष्ट्र सरकारने समाजात असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल, त्याचबरोबर अपंग, कष्टकरी, शेतकरी, निराधार असलेले व्यक्ती, विधवा महिला या सगळ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना ही त्यातलीच एक…. या योजनेद्वारे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना महिन्याला 1500 रुपये मदत दिली जाते. त्यामुळे  आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना जगण्यासाठी आधार मिळतो.

संजय गांधी निराधार योजना 2025- 1500 रुपये ऐवजी मिळणार 2500 रुपये 

संजय गांधी निराधार योजना 2025 या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व व्यक्तींसाठी त्याचबरोबर ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे की संजय गांधी निराधार योजनेसाठी जे पैसे दिले जातात, त्यामध्ये 1000 रुपये वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच आता या योजनेद्वारे 2500 रुपये महिना मिळणार आहेत.

2500 रुपये कधीपासून मिळणार आहेत, त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता काय असेल, कागदपत्रे कोणती लागतील ही सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत. 

संजय गांधी निराधार योजना 2025 साठी पात्रता काय असेल?

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  2. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 21000 रुपये पेक्षा कमी किंवा 21000 रुपये असणे गरजेचे आहे. 
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार खालीलपैकी एका अटीमध्ये बसणे गरजेचे आहे
  • निराधार पुरुष किंवा महिला ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे.
  • ज्या मुलांच्या आई वडील मृत्यू पावले आहेत म्हणजेच अनाथ मुले.
  • सर्व श्रेणी वर्गातील अपंग व्यक्ती.
  • मोठा आजार झाला असेल म्हणजेच क्षय रोगासारख्या आजारामध्ये तुम्हाला मदत हवी असेल तर या योजनेद्वारे पुरुष किंवा महिला यांना लाभ मिळू शकतो.
  • निराधार, विधवा आणि घटस्फोटीत महिला

पात्र असणारा अर्जदारांसाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुराणा म्हणजेच प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र.
  3. बँक खात्या संबंधित माहिती.
  4. पासपोर्ट साईज फोटो.
  5. क्षयरोगासारखा आजार असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र. 
  6. अर्जदाराचे वय सांगत असणारा पुरावा.
  7. अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा असं कागदपत्र जे सांगेल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  21000 रुपये पेक्षा कमी आहे.
  8. अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाच प्रमाणपत्र.
  9. विधवा महिलांसाठी  पतीचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र.

कधी सुरुवात होईल 2500रुपये मिळायला 

संजय गांधी निराधार योजना 2025 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  जाहीर केले आहे की ऑक्टोबर पासून जे अर्जदार किंवा लाभार्थ्या आहेत त्यांना 2500 रुपये महिना मिळायला सुरुवात होईल. त्यासाठी 570 कोटींचा निधी देखील मंजूर झाला आहे .त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल आणि अजून फॉर्म भरला नसेल, तर नक्कीच फॉर्म भरून घ्या म्हणजे तुम्हाला देखील महिना 2500 रुपयांची मदत मिळेल.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

संजय गांधी निराधार योजना 2025 या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय किंवा संजय गांधी निराधार योजना शाखा किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतात. 

Leave a Comment

Index