
Table of Contents
Toggleयोजनेची थोडक्यात माहिती:
प्रत्येक अल्प उत्पन्न गटाच्या लोकांच स्वतःच हक्काचं घर शहरात असावं असं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री आवास योजना2.0 सुरू केलेली आहे. या योजनेचा हेतू म्हणजे गृह कर्जामध्ये सबसिडी देऊन स्वतःच हक्काचं घर खरेदी करण्यात प्रोत्साहन देणे.या योजनेअंतर्गत आपल्याला 1 लाख 80 हजार रुपयाची सबसिडी शासनाकडून दिली जाते.
ही योजना 2015 मध्ये सुरू केलेली असून लाखो लोकांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्हाला देखील तुमच्या घराच स्वप्न पूर्ण करायचं असेल,तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या. लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे उत्पन् तीन गटांमध्ये असायला हवं ते गट म्हणजे EWS, LIG आणि MIG. या योजनेची पात्रता काय आहे,अर्ज कसा भरायचा, कुठे भरायचा त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणते लागतील ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये:
घटक | माहिती |
---|---|
योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना |
सुरूवात करणारे (केंद्र/राज्य सरकार) | केंद्र सरकार |
लाभार्थी कोण |
|
उद्देश | – सर्व सामान्य नागरिकांना सबसिडी सह घर मिळवून देणे |
अधिकृत वेबसाईट | शहरी भागासाठी: https://pmaymis.gov.in ग्रामीण भागासाठी: https://pmayg.nic.in |
योजनेचा उद्देश:
- सामान्य लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे.
- महिला व समाजातील दुर्बल घटकांना प्राधान्य देणे.
- समाजातील बेघर कुटुंबांना स्वतःच हक्काचं घर मिळवून देणे.
- शहरी व ग्रामीण भागातील गृहनिर्माण सुविधा वाढवणे.
योजनेचा लाभ:
- गरीब किंवा बेघर कुटुंबांना कायमस्वरूपीचा निवास मिळतो.
- CLSS (क्रेडिट लिंक्ड सबसिडी): सरकारकडून ग्रह कर्जावरील व्याजावर सबसिडी मिळते.
- महिलांना घरामध्ये मालकी हक्क मिळतो.
पात्रता:
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न खालील एका गटामध्ये असायला हवं
EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक)
तुमचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असेल तर तुम्ही EWS या गटामध्ये बसता.
LIG (कमी उत्पन्न गट)
तुमचे वार्षिक उत्पन्न जर 3 लाख ते 6 लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्ही LIG या उत्पन्न गटामध्ये बसता.
MIG (मध्यम उत्पन्न गट)
आणि तुमचे वार्षिक उत्पन्न जर 6 लाख ते 9 लाख च्या दरम्यान असेल तर तुम्ही MIG या गटामध्ये बसता. - या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय नागरिक असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या नावावरती देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही ग्रह निर्माण योजनेतून लाभ मिळालेला नसावा.
- प्रधानमंत्री आवास योजनेत विधवा व दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याची तरतूद आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड,मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड
- भारतीय नागरिक असल्याचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र.
- EWS प्रमाणपत्र / LIG प्रमाणपत्र / MIG प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पगार स्लिप आयटी रिटर्न स्टेटमेंट
- मालमत्ता मूल्यांकन प्रमाणपत्र -यासाठी बँक स्टेटमेंट आणि अकाउंट स्टेटमेंट द्यावे लागेल.
- अर्जदाराकडे भारतामध्ये पक्के घर नसल्याचा पुरावा.
- या योजनेअंतर्गत अर्जदार घर घेत असल्याचा किंवा बांधत असल्याचा पुरावा.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- https://pmaymis.gov.in/ वर लॉग इन करा.
- ‘Citizen Assessment’ ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक भरा.
- अर्जदाराची वैयक्तिक माहिती त्याचबरोबर उत्पन्नाचा सगळा तपशील भरा.
- आता तुमचा अर्ज सबमिट करा आणि रिसीट डाऊनलोड करून घ्या.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड,मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड
- भारतीय नागरिक असल्याचे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र.
- EWS प्रमाणपत्र / LIG प्रमाणपत्र / MIG प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पगार स्लिप आयटी रिटर्न स्टेटमेंट
- मालमत्ता मूल्यांकन प्रमाणपत्र -यासाठी बँक स्टेटमेंट आणि अकाउंट स्टेटमेंट द्यावे लागेल.
- अर्जदाराकडे भारतामध्ये पक्के घर नसल्याचा पुरावा
- या योजनेअंतर्गत अर्जदार घर घेत असल्याचा किंवा बांधत असल्याचा पुरावा.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- https://pmaymis.gov.in/ वर लॉग इन करा.
- ‘Citizen Assessment’ ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार क्रमांक भरा.
- अर्जदाराची वैयक्तिक माहिती त्याचबरोबर उत्पन्नाचा सगळा तपशील भरा’
- आता तुमचा अर्ज सबमिट करा आणि रिसीट डाऊनलोड करून घ्या
निष्कर्ष:
प्रधानमंत्री आवास योजना ही तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारी महत्त्वाची योजना आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच या संधीचा लाभ घ्या. आजच तुमच्या जवळच्या अधिकृत संकेत स्थळावरती जाऊन अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नातील घर मिळवा.