
Table of Contents
Toggleकाय आहे बांधकाम कामगार भांडी वाटप योजना?
बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ही महाराष्ट्र शासनाने राबवलेली एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, नोंदणीकृत कामगारांना स्वयंपाकाची भांडी मोफत दिली जातात. या योजनेचा हेतू बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंब स्वच्छता, आरोग्य आणि चांगल्या जीवन शैलीकडे वळावेत हा आहे.
बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत ग्रह उपयोगी वस्तू संच दिला जातो. काही दिवसांपूर्वी भांडेकिट वाटप प्रक्रिया बंद करण्यात आली होती, पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज अगदी घरबसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज कशा पद्धतीने करायचा, याची पात्रता काय आहे, याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय लागतील या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
योजनेचे नाव | बांधकाम कामगार भांडी वाटप योजना |
---|---|
सुरूवात करणारे (केंद्र/राज्य सरकार) | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण | बांधकाम कामगार |
उद्देश | भांडे खरेदीचा आर्थिक भार कमी करण्यासाठी बांधकाम कामगारांना मदत करणे. |
योजनेचा लाभ | बांधकाम कामगारांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांचा संच उपलब्ध करून दिला जातो. |
पात्रता | महाराष्ट्रात रहिवासी असणारे बांधकाम कामगार |
योजनेची सुरुवात | 17 ऑक्टोबर 2020 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | mahabocw.in |
योजनेचा उद्देश
1. भांडे खरेदीचा आर्थिक भार कमी करण्यासाठी बांधकाम कामगारांना मदत करणे.
2. बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्य व सुरक्षित स्वयंपाकाची सुविधा करून देणे.
योजनेचा लाभ
1. बांधकाम कामगारांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांचा संच उपलब्ध करून दिला जातो.
2. या भांड्यांमध्ये कढई, ताटे,चमचे,वाट्या, स्टीलची टाकी अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.
या योजनेसाठी पात्रता काय असेल?
1. बांधकाम कामगार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. बांधकाम कामगाराची बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे.
3. बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळात नोंदणी 1 वर्ष जुनी असणे आवश्यक आहे.
4. अर्जदार सध्या बांधकाम कामातच काम करत असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते असतील?
1. बांधकाम कामगाराचे आधार कार्ड
2. बांधकाम मंडळामध्ये नोंदणी केलेले प्रमाणपत्र
3. बांधकाम कामगार करत असल्याचे पुरावे.
4. बांधकाम कामगारांचा पासपोर्ट साईज फोटो
5. बांधकाम कामगारांचा रहिवासी दाखला.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1. खाली दिलेल्या साइटवर जा
hitkit.mahabocw.in/appointment
2. अर्जदाराने वैयक्तिक तपशील भरून घ्यावा.
3. अपॉइंमेंट डेट या ऑप्शन वर क्लिक करा व कॅलेंडर मध्ये जी रिकामी तारीख असेल त्यावर क्लिक करा आणि त्याच तारखेला तुम्हाला तुमचे भांडे किट मिळेल.
4. स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करा आणि भरून घ्या.
5. भरून झाल्यावर घोषणापत्र स्कॅन करा आणि अपलोड करून द्या.
6. अपॉइंमेंट प्रिंट करून घ्या.
7. अपार्टमेंटच्या दिवशी अपॉइंटमेंट प्रिंट घेऊन जा. तुम्हाला भांडे किट मिळेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्र.1: बांधकाम कामगार भांडी वाटप ही योजना कोणासाठी आहे?
उ: महाराष्ट्रातील बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी ही योजना आहे.
प्र.2: अर्ज करण्यासाठी कोण पात्र असेल?
उ: महाराष्ट्रात रहिवासी असणारे बांधकाम कामगार ज्यांची बांधकाम मंडळामध्ये नोंदणी झालेली असेल.
प्र.3: ही योजना फक्त पुरुष कामगारांसाठीच आहे का?
उ: नाही ही योजना पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी आहे
प्र.4: भांडी वाटप मोफत केले जाते का?
उ: होय, पात्र असणाऱ्या कामगारांना भांडी मोफत दिली जातात.
प्र.5: अर्ज करताना काही पैसे द्यावे लागतील का?
उ: नाही, ही योजना पूर्णपणे मोफत आहे, तुम्हाला काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत.