लाडकी बहीण योजना – ऑगस्ट अपडेट 2025

लाडकी बहीण योजना

लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दर महिना दीड 1500 रुपये बँक खात्यामध्ये दिले जातात. ऑगस्ट महिना पूर्ण होत आला तरी देखील पैसे आपल्या खात्यामध्ये आले नाहीत. तर पैसे कधी येतील, कोणाला मिळतील या सगळ्या अपडेट आपण पाहणार आहोत.

मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेत सतत फसवणुकीच्या बातम्या येत असताना, महाराष्ट्र सरकार द्वारे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारद्वारे 26 लाख लाभार्थ्यांची नावे अपात्र यादीत टाकण्यात आली आहेत. हे तेच लाभार्थी आहेत जे पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेत आहे, या अपात्र यादीमध्ये 12000 हजार पुरुष देखील आहेत. महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही सगळी माहिती दिली आहे. 

महिला आणि बाल विकास विभागाने सर्व पात्र व अपात्र लाभार्थ्यांची नावे पडताळणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत. आता प्रादेशिक पातळीवरती हे लाभार्थी पात्र आहेत की नाही हे तपासले जात आहे.

तपासा दरम्यान लाभार्थी अपात्र आढळले तर त्यांची नावे काढून टाकण्यात येणार आहे. पडताळणी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई अपात्र उमेदवारांवरती केली जाईल. 

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता केव्हा?

लाडकी बहिणी योजनेचा काही महिलांना जुलै महिन्याचा हप्ता 8 ऑगस्ट 2025 रोजी जमा झाला होता. आता महिलांच्या मनात प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता केव्हा जमा होणार?  काही महिलांना जुलैचा हप्ता देखील मिळाला नाही, त्यांना दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये मिळतील आणि ज्यांना फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळायचा आहे, त्यांना 1500 हजार रुपये मिळतील. हे पैसे 5 ते 10 सप्टेंबरच्या च्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. 

ई-KYC न केल्यास थांबेल हप्ता

ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून जाहीर  झालेला नाही, पण सप्टेंबरच्या 5 ते 10 तारखेला मिळू शकतो. फसवणूक करणाऱ्या महिला व पुरुष यांची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास  सांगितली आहे. सर्व महिला लाभार्थ्यांना त्यांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याशी जोडलेले आहे त्या बँक खात्याद्वारे ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांनी ई-KYC पूर्ण केले नाही, तर त्यांचे फायदे बंद केले जातील.

लाडकी बहीण योजना कोणत्या महिलांसाठी चालू राहील?

लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र राहील याची पडताळणी करण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना सांगितले आहे.

 त्यामुळे तुम्हाला अंगणवाडी सेविकेचा फोन येऊ शकतो किंवा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊ शकते. त्यांना तुम्ही ही सगळी माहिती द्या, त्यानंतरच तुमचा या पुढचा माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ चालू राहील. 

खाली दिलेल्या अटींमध्ये बसणाऱ्या महिलाच यापुढे माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकतात

  1. 21 ते 65 वयोगटातील महिला.
  2. निराधार विधवा आणि घटस्फोटीत महिला.
  3.  त्याचबरोबर एका रेशन कार्ड मधल्या दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  4. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न 25 0000 पेक्षा जास्त नसावे.
  5. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला टॅक्स भरावा लागत नसावा.
  6. कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीला नसावं.
  7. त्याचबरोबर महिलांच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर सोडून दुसरी कोणतीही फोर व्हीलर नसावी.

या सर्व गोष्टींची पडताळणी अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे.

Leave a Comment

Index