
Table of Contents
TogglePradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) 2025
भारत सरकारने महिलांसाठी बऱ्याचशा योजना काढलेल्या आहेत. त्यातलीच एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY).
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) ही योजना गर्भवती महिला त्याचबरोबर स्तनपान करणाऱ्या मातांसाठी राबवण्यात आलेली योजना आहे. गर्भवती महिला त्याचबरोबर स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर समाजातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांतील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा लाभ काय असेल, योजनेची पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कागदपत्रे काय लागतील हे सर्व आपण पाहणार आहोत.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) योजनेची ठळक वैशिष्ट्ये
योजनेचे नाव | Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) |
---|---|
सुरूवात करणारे | केंद्र सरकार |
सुरू करण्यात आलेले वर्ष | 1 जानेवारी 2017 |
लाभार्थी कोण | गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता |
उद्देश | गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत पुरवणे |
लाभाची रक्कम | ₹11,000 रुपये |
अधिकृत वेबसाईट | https://web.umang.gov.in |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) योजनेचा उद्देश
- गर्भवती त्याचबरोबर स्तनपान करत असणाऱ्या मातांना आर्थिक मदत देणे.
- गर्भ काळामध्ये मातेचे व बाळाचे पोषण होण्यास मदत करणे.
- जन्माला येणाऱ्या बालकांच्या वाढीसाठी त्याचबरोबर आरोग्य तपासणी आणि लसीकरण यासाठी मदत उपलब्ध करून देणे.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या किंवा गरीब असणाऱ्या महिलांना सुरक्षित आणि आरोग्यदायी मातृत्व मिळावं याची काळजी घेणे.
- बालक आणि महिला यांच्या आरोग्या संबंधी जनजागृती वाढण्यास प्रोत्साहन देणे.
योजनेचा लाभ काय होईल ?
पहिल्या मुलासाठी लाभ दोन हप्त्यांमध्ये दिला जाईल
- पहिला हप्ता:
पहिल्या मुलाचा पहिला हप्ता घेण्यासाठी महिलेला गर्भधारणेची नोंदणी करणे गरजेचे आहे. यामध्ये शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आतच तुम्हाला अंगणवाडी केंद्रात जाऊन किंवा आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे. ही तपासणी झाल्यावरच तुम्हाला 3000 रुपये बँक खात्यामध्ये मिळतील.
- दुसरा हप्ता:
महिलेची प्रसूती झाल्यानंतर नोंद केली जाईल. त्यानंतर सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाद्वारे बाळाला 14 आठवड्यांपर्यंत सर्व लसी देणे गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्हाला दुसरा हप्ता 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळतील.
दुसऱ्या मुलासाठी( मुलगी असल्यास) लाभ एका हप्त्यामध्ये मिळेल
दुसऱ्या मुलाच्या वेळी जेव्हा गर्भधारणा होईल तेव्हा सहा महिन्याच्या आतच तुम्हाला अंगणवाडी केंद्रात नोंदणी करावी लागेल. त्याचबरोबर सहा महिन्यांच्या आत एक तरी प्रसूतीपूर्व तपासणी अंगणवाडी केंद्रात करणे गरजेचे आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर नोंद देखील करावी लागेल. मुलीच्या जन्मानंतर 14 आठवड्यांपर्यंत तुम्हाला सार्वजनिक लसीकरण कार्यक्रमाद्वारे मुलीला लसीकरण करणे आवश्यक आहे. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला 6000 रुपये बँक खात्यामध्ये मिळतील.
असे तुम्हाला दोन मुलांचे मिळून एकूण 11 हजार रुपये बँक खात्यामध्ये मिळतील.
महत्त्वाची माहिती: मातेचा गर्भपात झाला असेल किंवा मृत बाळाला जन्म दिला असेल, तर भविष्यात पुन्हा गर्भधारणा झाल्यास महिलेला लाभार्थी मानण्यात येईल.
या योजनेसाठी पात्रता काय असेल?
- अर्जदार महिला असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 250000 पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
- अर्ज करताना महिलेने गर्भवती असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेचे वय 19 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- गर्भधारणा झाल्यानंतर अंगणवाडी केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे.
योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
- महिलेचे आधार कार्ड
- महिलेची गर्भधारणा झाले असल्याचे प्रमाणपत्र.
- आयडेंटिटी प्रूफ( यामध्ये वोटर आयडी कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट चालेल)
- महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 250000 पेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला.
- महिलेच्या बँक पासबुकचा तपशील.
- महिलेचे वय 19 वर्षापेक्षा जास्त आहे हा सांगणारा जन्मतारखेचा पुरावा लागेल.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाइन अर्ज
Pradhan Mantri Matru Vandana Yojana या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही शासनाच्या https://web.umang.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल.
ऑफलाइन अर्ज
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन गर्भधारणा झाल्याची नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकेद्वारे फॉर्म देण्यात येईल. तो फॉर्म भरावा लागेल.
- योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर अंगणवाडी सेविकेद्वारे पडताळणी केल्यानंतर अर्ज उच्च अधिकाऱ्याद्वारे देखील पडताळला जाईल व तुमचा अर्ज मंजूर केला जाईल.
हे देखील वाचा
HDFC Bank Scholarship 2025- मुलांच्या शिक्षणासाठी HDFC बँक 75000 रुपये मदत करणार
Lek Ladki Yojana 2025: लेक लाडकी योजना 2025 अर्ज प्रक्रिया, पात्रता व लाभांची संपूर्ण माहिती