
Table of Contents
Toggleगॅस सिलेंडर ३०० रुपयांनी स्वस्त
सरकारने जनतेसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्यातल्याच एका योजनेनुसार नागरिकांना एलपीजी सिलेंडर गॅस 300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर आज आपण ही योजना नेमकी कोणती आहे? यासाठी पात्रता काय असेल? त्याचबरोबर तुम्हाला किती लाभ मिळेल? योजनेचा अर्ज कसा करायचा? हा सर्व तपशील पाहणार आहोत.
गावाकडे पूर्वीच्या काळात किंवा आत्ता देखील आपली आजी असो किंवा गावामध्ये राहणाऱ्या इतर महिला स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करत असत. पण त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होत होता. डोळ्यातून पाणी येत असे त्याचबरोबर श्वास घेण्यास देखील त्यांना त्रासदायक होत होतं. याच गोष्टींचा विचार करून सरकारने एक योजना आणली होती ती म्हणजे प्रधानमंत्री उज्वला योजना. गावाकडील लोकांना सिलेंडर विकत घेणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही त्यासाठीच ही योजना आणली गेली होती. या योजनेद्वारे गॅस शेगडी मोफत मिळते आणि जो गॅस सिलेंडर आहे त्यामध्ये सबसिडी मिळते.
प्रधानमंत्री उज्वला योजना गावाकडील गरीब महिलांसाठी एक मोठी आधाराची योजना बनली आहे.
या योजनेची सबसिडी आता सरकारद्वारे वाढवण्यात आली आहे. त्याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढे वाचा.
हे देखील वाचा: Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) 2025 : गर्भवती महिलांना 11000 रुपये मदत
कसा मिळेल प्रधानमंत्री उज्वला योजनेद्वारे गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त?
प्रधानमंत्री उज्वला योजना 1 मे 2016 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजनेनुसार 2020 पर्यंत 8 करोड महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन मोफत देण्याच उद्दिष्ट होत.
ग्रामीण महिलांना चुलीवर स्वयंपाक करायला लागू नये आणि त्यांचा त्रास कमी व्हावा, त्याचबरोबर त्यांना गॅस सिलेंडर घेण्यासाठी किंवा गॅस शेगडी घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर देण्यासाठी सबसिडी मिळते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. सामान्य लोकांना सिलेंडर मिळतो त्यापेक्षा प्रधानमंत्री उज्वला योजनेद्वारे 300 रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळत आहे.
तुमच्या भागामध्ये 14.2 किलोग्राम सिलेंडरची जी किंमत असेल त्यापेक्षा 300 रुपयांनी स्वस्त तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्याचबरोबर जर पहिल्यांदा शेगडी घेत असाल तर ती तुम्हाला मोफत मिळेल.
हे देखील वाचा: संजय गांधी निराधार योजना 2025- सरकारची घोषणा, आता मिळणार 2500 रुपये महिना
कोणाला मिळू शकतो या योजनेचा लाभ?
- प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे नाव SECC-२०११ या यादीत किंवा बीपीएल (BPL)यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.
SECC-२०११ -ही एक सर्वेक्षण यादी आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक माहितीची यादी करण्यात आलेली आहे.जसं की कुटुंबातील असलेल्या व्यक्तींची संख्या, उत्पन्न, कुटुंबाची जात, कुटुंबाची असलेली आर्थिक स्थिती, कुटुंबातील व्यक्तींचे शिक्षण.
BPL:पीएल म्हणजे ज्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सरकारने ठरवलेल्या मर्यादा पेक्षा खाली आहे, ते कुटुंब बीपीएल यादीत येते. (तुम्ही जर बीपीएल यादीत असाल तर तुमच्याकडे रेशन कार्ड देखील असेल.)
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबात इतर कोणीही प्रधानमंत्री उज्वला योजनेद्वारे एलपीजी कनेक्शन घेतलेले नसावे.
- महिलांना सबसिडी मिळण्यासाठी त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते असणे गरजेचे आहे. त्याद्वारे त्यांना सबसिडी मिळेल.
- अर्ज करणाऱ्या महिलेकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील?
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड.
- राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते.
- भारतीय नागरिक असल्याचा तसेच राहत्या ठिकाणाचा पुरावा.
- कुटुंबाचे बीपीएल रेशन कार्ड.
- महिलेचे पासपोर्ट साईज फोटो
- महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे सांगणारा वयाचा पुरावा.
- अर्जदार महिला अनुसूचित जातीमध्ये असल्यास जात प्रमाणपत्र.
प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा www.pmuy.gov.in
- मेन पेजवर गेल्यावरती Apply for New Ujjwala 2.0 Connection ह्या ऑप्शन वर क्लिक करा.
- या योजनेद्वारे तुम्ही कोणताही गॅस घेऊ शकता म्हणजेच भारत पेट्रोलियम, इंडियन, एचपी तर त्यासाठी एक गॅस एजन्सी तुम्हाला निवडायची आहे.
- एजन्सी निवडल्यानंतर ऑनलाइन एक फॉर्म येईल त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, कागदपत्रांची माहिती आणि बँक खात्याचा तपशील भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि फॉर्म ची प्रिंट आऊट काढा.
- प्रिंट आऊट काढलेला फॉर्म त्याचबरोबर सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन जमा करा.
- तुमचा फॉर्म त्याचबरोबर कागदपत्रे तपासल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन मिळेल.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- तुमच्या भागातील जवळच्या गॅस वितरण करणाऱ्या व्यक्तीकडे जा.
- त्याच्याकडून तुम्हाला प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अर्जाचा फॉर्म मिळेल.
- आता फॉर्म भरा त्याला लागणारी आवश्यक ती कागदपत्रे जोडा आणि हा फॉर्म तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन जमा करा.
- 10 ते 15 दिवसांमध्ये सर्व माहिती तपासल्यानंतर तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन मिळेल.यामध्ये नवीन शेगडी असेल ,त्याचबरोबर पहिल्या वेळीचे गॅस सिलेंडरचे रिफील आहे ते देखील मोफत मिळेल.
मोफत कनेक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला देखील प्रधानमंत्री उज्वला योजनेद्वारे गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त मिळेल. तेव्हा तुम्ही जर पात्र असाल तर लवकर अर्ज करा.
हे देखील वाचा:घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना – प्रधानमंत्री आवास योजना