
Table of Contents
Toggleतार कुंपण योजना २०२५
देश प्रगतिशील होण्यासाठी शेती हा भारताचा कणा मानला जातो. जो शेतकरी आहे तो दिवस रात्र मेहनत करून अन्नधान्य पिकवतो. परंतु शेतकऱ्यांसमोर खूप सार्या अडचणी येतात. अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या शेताचा मोठं नुकसान होतं. त्यातलीच एक अडचण म्हणजे शेतामध्ये जर जंगली प्राणी घुसले तर शेताच मोठ नुकसान करतात. जसे की रान डुक्कर, गाई-गुरे इतर भटक्या जमातीचे प्राणी शेतात आले तर ते तयार झालेल्या पिकाची नासाडी करतात.अशी शेताची नासाडी होऊ नये यासाठी तार कुंपण करणे हा उपाय आहे. पण आर्थिक दृष्ट्या सबल नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे शक्य होत नाही. त्यासाठीच सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी तार कुंपण योजना २०२५(Tar Kumpan Subsidy Yojana) राबवली आहे. या योजनेनुसार शेतीला तार कुंपण करण्यासाठी 90% अनुदान मिळणार आहे.
तार कुंपण योजना २०२५ या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीभोवती कुंपण घालता येईल, त्यामुळे शेतीचे रक्षण होईल व शेतीसाठी प्रोत्साहन मिळेल.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने ही योजना राबवण्यात आलेली आहे. या योजनेसाठी पात्रता काय असेल? अर्ज कसा करायचा? त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा? ही सगळी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
हे देखील वाचा: गॅस सिलेंडर ३०० रुपयांनी स्वस्त – तुम्हालाही फायदा घ्यायचा आहे का? प्रक्रिया व तपशील वाचा
योजनेचा मुख्य उद्देश
1.शेतीला कुंपण करून शेतकऱ्यांच्या पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करणे.
2.आर्थिक दृष्ट्या प्रबळ नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतीला मदत करून प्रोत्साहन देणे.
3. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे व त्याचबरोबर आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांना वळवणे.
4. या योजनेमुळे कृषी उत्पादनात देखील वाढ होईल व राज्याची अर्थव्यवस्था सुधारेल.
योजनेचा लाभ काय मिळेल
- शेतकऱ्याकडे 1 ते 2 हेक्टर शेती असल्यास 90 %लाभ देण्यात येईल उरलेले 10% पैसे शेतकऱ्याला भरावे लागतील.
- शेतकऱ्याकडे जर 2 ते 3 हेक्टर शेती असेल तर त्या शेतकऱ्याला 60%अनुदान मिळणार आहे उरलेले 40% शेतकऱ्याला भरावे लागेल.
- जर शेतकऱ्याकडे 3 ते 5 हेक्टर शेती असेल तर त्या शेतकऱ्याला 50% अनुदान मिळेल.
- आणि 5 हेक्टर पेक्षा जर जास्त शेती असेल तर त्या शेतकऱ्याला 40%अनुदान मिळणार आहे. बाकीचे उरलेले पैसे शेतकऱ्याला भरावे लागतील.
हे देखील वाचा: Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) 2025 : गर्भवती महिलांना 11000 रुपये मदत
योजनासाठी पात्रता काय असेल
- तार कुंपण योजना २०२५ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- ७/१२ उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव असणे गरजेचे आहे किंवा शेत जमीन भाड्याने घेतल्याचा पुरावा द्यावा लागेल.
- शेत जमिनीचे पाळीव प्राण्यांमुळे नुकसान होत असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
- SC/ST व इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल.
- ज्या शेत जमिनीवर अर्ज देऊन तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ती जमीन अतिक्रमण केलेली नसावी.
- काही टक्के अनुदान सरकार द्वारे देण्यात येणार आहे, त्यामुळे उरलेला खर्च शेतकऱ्याला करावा लागेल.
कागदपत्र कोणते लागतील
- शेतकऱ्याच्या शेतीचा ७/१२ उतारा
- गाव नमुना आठ अ द्यावा लागेल.
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड द्यावे लागेल.
- मागासवर्गीय जातीमध्ये शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र द्यावे लागेल.
- एका शेतीचे जास्त मालक असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला द्यावा लागेल किंवा जर शेती भाड्याने करण्यासाठी घेतली असेल तर त्याचा पुरावा द्यावा लागेल.
- जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याचा पुरावा म्हणजेच वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
हे देखील वाचा: घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना – प्रधानमंत्री आवास योजना
असा करा योजनेसाठी अर्ज
- तार कुंपण योजना २०२५ या योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तालुक्याच्या पंचायत समितीकडे जावे लागेल. तिथून तुम्हाला एक अर्ज मिळेल.
- मिळालेला अर्ज अचूक भरून त्याला लागणारी सर्व कागदपत्रे जोडून घ्या.
- भरलेला अर्ज कागदपत्रांसह तालुका पंचायत समितीकडे जमा करा.
- काही दिवसात पडताळणी झाल्यावरजर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होतील.
हे देखील वाचा: HDFC Bank Scholarship 2025- मुलांच्या शिक्षणासाठी HDFC बँक 75000 रुपये मदत करणार