
Table of Contents
ToggleHDFC Bank Scholarship 2025
भारतातील अनेक विद्यार्थ्यांना पालकांच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही. कामगार वर्गातील अनेक पालकांना त्यांच्या मुलांना चांगला शाळेमध्ये घालायचे असते, परंतु त्यांची कितीही इच्छा असली तरी देखील शाळेची फी, पुस्तके आणि इतर खर्च भागवणे अवघड जाते.
अशा आर्थिक दृष्ट्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी HDFC बँकेने स्कॉलरशिप प्रोग्रॅम आयोजित केला आहे.
HDFC Parivartan Scholarship 2025 योजनेअंतर्गत, प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 75000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, योजनेची पात्रता काय असेल, त्याचबरोबर कागदपत्रे काय लागतील ही सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुमची मुलं देखील शिक्षण घेत आहेत, पण तुम्ही आर्थिकदृष्ट्या त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नसाल, तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.
योजनेचे उद्दिष्ट
- जी मुलं आर्थिकदृष्ट्या संकटात आहेत, ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे किंवा नोकरी गेली आहे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही, त्या मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
- शाळा सोडावी लागणाऱ्या किंवा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास परत एकदा सुरू करण्यासाठी या योजनेद्वारे मदत केली जाते.
- शिक्षण सोडावे लागणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते.
- शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी मदत.
योजनेचा लाभ काय असेल?
- 1 ते 6 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 15000 रुपये देण्यात येतील.
- 7 ते 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 18000 रुपये वार्षिक दिले जातील.
- आयटीया, डिप्लोमा किंवा जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएशन मध्ये आहेत त्यांना 30000 रुपये वार्षिक दिले जातील.
- जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत किंवा काहीतरी व्यवसाय करण्यासाठी कोर्स करत आहेत, त्यांना 75000 रुपये पर्यंत मदत केली जाईल.
योजनेसाठी पात्रता काय असेल?
- HDFC Bank Scholarship या योजनेसाठी अर्जदार भारतातील कोणत्याही मान्य प्राप्त शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असावा .
- या योजनेचा 1 ते 6, 7 ते 12, आयटीआय, डिप्लोमा किंवा अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट त्याचबरोबर कोणत्याही व्यवसायाचा कोर्स करत असलेले विद्यार्थी लाभ घेऊ शकतात.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला मागील वर्षात कमीत कमी 55% गुण मिळालेले असावेत.
5. घरामध्ये आर्थिक संकट असेल किंवा माता पित्याचा मृत्यू झाला असेल तर त्या अर्जदाराला प्राधान्य दिले जाईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे
- अर्जदार विद्यार्थ्याला ओळखपत्र किंवा आधार कार्ड लागेल.
- अर्जदार विद्यार्थ्याला शाळा किंवा कॉलेजमधले बोनाफाईड प्रमाणपत्र द्यावे लागेल.
- विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुण 55 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, याचे प्रमाणपत्र म्हणून मागील वर्षातील मार्कशीट.
- कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला लागेल.
- विद्यार्थी लहान असेल तर पालकांचे बँक पासबुक आणि विद्यार्थी जर कॉलेजमध्ये असेल तर विद्यार्थ्यांचे बँक पासबुकची झेरॉक्स.
- पासपोर्ट साईज फोटो.
HDFC Bank Scholarship 2025 योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Buddy4Study या वेबसाईटवर जा.
- वेबसाईटवर गेल्यावर तिथे search बारमध्ये HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2025 लिहा.
- HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2025 टाईप केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या.
- त्यानंतर एक फॉर्म येईल त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, त्याचबरोबर शैक्षणिक माहिती आणि बँकेसंबंधीत सर्व माहिती भरा.
- फॉर्म भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय येईल त्यामध्ये आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- आता फॉर्म तपासून घ्या आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2025 आहे तर त्या आधीच अर्ज करून घ्या.
निष्कर्ष
HDFC Bank Scholarship 2025 ही शिष्यवृत्ती अशा मुलांना दिली जाते ज्यांचे पालक आर्थिक अडचणीत आहेत, ज्यांचे पालक निधन पावले आहेत किंवा त्यांची नोकरी गेली आहे, किंवा ज्यांचे शिक्षण इतर कोणत्याही कारणामुळे शक्य नाही.जर तुमची मुलेही शिक्षण घेत असतील, पण तुम्ही त्यांच्या गरजा आर्थिकदृष्ट्या पूर्ण करू शकत नसाल, तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्या.