
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ‘माझी लाडकी बहिन योजना’ ही आज सर्वात चर्चेत असलेली योजना आहे. राज्यातील हजारो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेचे उद्दिष्ट महिलांना दरमहा ₹१५०० पर्यंत आर्थिक मदत देणे आहे.
परंतु खूप साऱ्या अपात्र महिलांनी त्याचबरोबर पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला होता, म्हणून शासनाने पूर्ण पडताळणी करून योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांची यादी बनवली आहे.
अखेर, लाडकी बहिन योजनेची यादी (PDF) जाहीर करण्यात आली आहे. आणि त्यात पात्र महिलांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. जर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव या यादीत आहे का ते त्वरित तपासा.
Table of Contents
Toggleलाडकी बहीण योजना म्हणजे काय?
माझी लाडकी बहिन योजना’ ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठीची योजना आहे. याद्वारे –
1. महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत.
2. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे.
लाडकी बहीण योजना मंजूर यादी का महत्वाची आहे?
योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी ही यादी खूप महत्त्वाची आहे कारण –
1. यादीत नाव दिसले तरच खात्यात पैसे जमा होतील.
2. जर अर्ज अपूर्ण असेल किंवा कागदपत्रे चुकीची असतील तर नाव तिथे नसेल.
3. हप्ता नियमितपणे मिळत आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.
लाडकी बहीण योजना मंजूर यादी (Approved List PDF) कशी तपासावी?
1. ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईट उघडल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका व लॉगिन करा.
2. लॉग इन केल्यानंतर, मुख्य पृष्ठावर मंजूर यादी किंवा अर्ज स्थिती पर्याय शोधा.
3. त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे की नाही ते पहा.
4. Approved असेल म्हणजेच तुमचा अर्ज Approved आहे.
5. हेच तुम्ही नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करून देखील पाहू शकता.
Approved List PDF यादी कशी डाउनलोड करावी?
1. सरकारी अधिकृत पोर्टलवर “PDF डाउनलोड करा” असा पर्याय देण्यात आला आहे.
2. जिल्हा/तालुका यादी डाउनलोड करून तपासता येते.
3. यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव, नोंदणी क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील असतो.
4. लाडकी बहीण योजनेच्या ॲप वरती त्याचबरोबर पोर्टल वरती मंजूर यादी नियमितपणे अपडेट केली जाते, त्यामुळे नवीन माहितीसाठी नेहमी या ॲप किंवा पोर्टल वरती तपासणी करत राहणे गरजेचे आहे.
कोणत्या महिलांची नावे यादीत येतात?
1. विवाहित महिला (21 ते 60 वयोगटातील)
2. निराधार विधवा आणि घटस्फोटीत महिला.
3. आधार व बँक खाते लिंक असलेल्या महिला.
4. ज्या महिलांनी पूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर केला आहे.
5. त्याचबरोबर एका रेशन कार्ड मधल्या दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
जर तुमचे नाव यादीत नसेल तर काय करावे?
जर तुमचे नाव यादीत नसेल तर –
1. जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय / महसूल कार्यालयाशी संपर्क साधा.
2. आवश्यक कागदपत्रांची तपासणी करा आणि अर्ज पुन्हा सबमिट करा.
3. जर तुम्ही लाडकी बहिन योजनेसाठी पात्र असाल आणि तुमचे नाव या यादीत नसेल, तर तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने राबवलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे, यामध्ये योजनेची मंजुरी झाल्याचे PDF जाहीर झाल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर यापूर्वी खूप अपात्र महिलांनी त्याचबरोबर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला होता परंतु आता पडताळणी करून परत एकदा मंजूर यादी जाहीर करण्यात आली आहे. जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला देखील यापुढे दरमहा 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळतील.