
Table of Contents
ToggleLek Ladki Yojana 2025: लेक लाडकी योजनेची थोडक्यात माहिती:
Lek Ladki Yojana 2025 ही योजना महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2023 पासून सुरू केलेली आहे.राज्यात मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी,कुपोषण कमी व्हावे,बालविवाह रोखणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेनुसार 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना महाराष्ट्र सरकारकडून 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा त्याचबरोबर योजनेची पात्रता काय आहे,फायदे काय होतील हे सगळं आपण जाणून घेणार आहोत.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना 2025 |
सुरूवात करणारे (केंद्र/राज्य सरकार) | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण | 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुली |
उद्देश |
|
लागू वर्ष | योजना 2023 ला सुरू झाली आणि 5 वर्षे चालेल |
योजनेचा उद्देश:
- मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- मुलींच्या शिक्षणात चालना देणे.
- बालहत्या कमी करणे.
- बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
योजनेचा लाभ:
Lek Ladki Yojana 2025 या योजनेअंतर्गत मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाख 1000 रुपये लाभ देण्यात येणार आहे.सुरुवातीला जन्मानंतर 5 हजार मिळतील,इयत्ता पहिलीत गेल्यावरती 6 हजार रुपये, इयत्ता सहावी मध्ये 7 हजार,आठवीत 8 हजार रुपये आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये मिळतील. असे एकूण 1 लाख 1 हजार दिले जातील.
पात्रता:
- लेक लाडकी योजना 2025 या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
- ही योजना मुलगी 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला आली असेल तरच लागू राहील.
- लेक लाडकी ही योजना एका घरातील दोन मुलींना लागू राहील. जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर फक्त मुलीला लागू राहील.
- पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्ता साठी त्याचबरोबर दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज देतेवेळी आई-वडिलांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर एक मुलगी झाली किंवा दोन मुली झाल्या तरी देखील या योजनेचा लाभ घेता येईल,पण आई वडिलांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र द्यावे लागेल.
- लेक लाडकीयोजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे कुटुंब महाराष्ट्रामध्ये रहिवाशी असले आवश्यक आहे.
- लेक लाडकी योजना 2025 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला हवे.
- लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते महाराष्ट्र राज्यातील असायला हवे.
आवश्यक कागदपत्रे:
- लाभ घेणाऱ्या मुलीचा जन्म दाखला.
- लाभ घेणाऱ्या मुलींच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला – यासाठी तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला अनिवार्य राहील.
- मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
- लाभार्थी मुलीचे आधार कार्ड(पहिला हप्ता घेताना आधार कार्ड ची गरज नाही,पुढच्या हप्त्यांसाठी मात्र आधार कार्ड गरजेचे असेल)
- बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड ची छायांकित प्रत.
- पालकांचे मतदार ओळखपत्र गरजेचे आहे. शेवटचा हप्ता घेते वेळी म्हणजेच 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचं नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे.
- प्रत्येक हप्ता मिळण्यासाठी मुलगी शिक्षण घेत असल्याचा दाखला अनिवार्य आहे.
- पालकांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आवश्यक असेल.
- अंतिम हप्ता घेण्यासाठी मुलीचे लग्न झालेले नसणे आवश्यक आहे.यावेळी मुलीला अविवाहित असल्याबाबत घोषणापत्र द्यावे लागेल.
अर्ज प्रक्रिया:
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर मुलीचा जन्म झाला असेल तर ग्रामीण किंवा शहरी क्षेत्रांमध्ये मुलीच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर त्या क्षेत्रामधील अंगणवाडी सेविकेकडे सर्व कागदपत्रांसह अर्ज भरून द्यावा लागेल.
कागदपत्रांची कमी असेल किंवा अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर ती ठीक करण्यासाठी तुम्हाला काही वेळ दिला जाईल. ही सगळी अर्ज प्रक्रिया 2 महिन्याच्या आत पूर्ण होणे गरजेचे आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज ऑनलाईन देखील भरू शकता.ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील अंगणवाडी सेविका त्याचबरोबर मुख्य सेविका यांच्याद्वारे अर्ज अर्ज स्वीकारणे ,कागदपत्रे तपासणी व अर्ज पोर्टल वरती भरणे ही कार्यवाही केली जाईल.ग्रामीण आणि शहरी भागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्जाची पडताळणी करतील व त्यानंतर अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर केला जाईल.
लाभाचे हस्तांतरण थेट डीबीटी प्रक्रियेद्वारे केले जाईल.लाभ घेण्यासाठी जे खाते असेल ते आई व मुलगी यामध्ये संयुक्त असेल. मुलीच्या जन्मानंतर आईचा मृत्यू झाला असेल तर हे खाते मुलगी आणि वडील यांच्यामध्ये संयुक्त असेल.
लाभार्थी स्थलांतरित झाल्यास लाभ कसा घ्यावा?
लाभार्थी कुटुंब एक अथवा काही हप्ते घेतल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित झाले तर जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा लागेल.त्यानंतर कुटुंबाला पुढचे हप्ते मिळतील.
लाभार्थी कुटुंब जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतरित झाले असेल पुढचा लाभ मिळवण्यासाठी राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा लागेल.
निष्कर्ष:
लेक लाडकी योजना 2025 ही महाराष्ट्र सरकारने राबवलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे त्यांच्या शिक्षणाला चालना देणे त्याचबरोबर कुपोषण कमी करणे व बालविवाह रोखणे हा उद्देश आहे. या योजनेमुळे समाजात मुलींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन वाढायला मदत होईल त्याचबरोबर शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मुली जास्त सबल होतील. ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू झालेली आहे आणि 5 वर्षांपर्यंत चालणार आहे तर पात्र लाभार्थ्यांनी योग्य कागदपत्रांसह वेळेत अर्ज करून या रोखण्याचा लाभ घ्यावा.
लेक लाडकी योजना 2025 या योजने संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता.