Namo shetkari yojana 7th installment- नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता लवकरच होणार जमा

Namo shetkari yojana 7th installment

भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या देशाचा कणा मानले जाते. महाराष्ट्रात राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणत असतात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे त्याला अनुसरूनच महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी एक योजना आणली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्यामध्ये वर्षाला 6000  रुपये मिळतात. त्याच प्रकारे नमो शेतकरी ही  महाराष्ट्र सरकार द्वारे चालू करण्यात आलेली योजना आहे, यामध्ये देखील तुम्हाला वर्षाला 6000 रुपये मिळतील. त्यामुळे जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेता येईल म्हणजेच तुम्हाला वर्षाला 12000 रुपयांचा लाभ होईल. 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर त्यामध्ये वर्षाला 6000  रुपये मिळतात. त्याच प्रकारे नमो शेतकरी ही  महाराष्ट्र सरकार द्वारे चालू करण्यात आलेली योजना आहे, यामध्ये देखील तुम्हाला वर्षाला 6000 रुपये मिळतील. त्यामुळे जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेता येईल म्हणजेच तुम्हाला वर्षाला 12000 रुपयांचा लाभ होईल.

 शेतकऱ्यांना शेतीसाठी कीटकनाशके, खते किंवा शेतीसाठी लागणारी बियाणे यासाठी आर्थिक मदत म्हणून हा लाभ दिला जात आहे.

नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते देण्यात आले आहेत 7व्या हप्त्याचा GR आला आहे. तर 7वा हप्ता तुम्हाला कधी मिळेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

नमो शेतकरी योजनेचे उद्दिष्ट

  1. नमो शेतकरी योजना शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राबवण्यात आली आहे.
  2. शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, खते त्याचबरोबर बियाणे खरेदीसाठी या पैशांची मदत होईल.
  3. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे.
  4. शेतकऱ्यांनी शेतीकडे जास्तीत जास्त वळावे यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

नमो शेतकरी योजनेची ठळक वैशिष्ट्ये

योजनेचे नावनमो शेतकरी योजना
सुरूवात करणारे (केंद्र/राज्य सरकार)राज्य सरकार
सुरू करण्यात आलेले वर्ष2023 – 24
लाभार्थी कोणमहाराष्ट्रातील शेतकरी
उद्देशशेतकऱ्यांना बी बियाणे, कीटकनाशके व शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी आर्थिक मदत करणे.
लाभ काय असेलवर्षाला ₹6000 थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा.
अधिकृत वेबसाईटhttps://nsmny.mahait.org/

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात 2024 च्या डिसेंबर महिन्यात  जमा झाला आहे. आता सर्व शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचा आहे की 7वा हप्ता कधी मिळणार?  सरकारी वेबसाईटवरून माहिती मिळाली आहे की Namo shetkari yojana 7th installment लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्याचा GR देखील आला आहे.

योजनेचा GR म्हणजे काय?- GR म्हणजे एक सरकारी ठराव असतो, ज्यामध्ये योजने संबंधित निर्णय किंवा काही बदल करायचा असेल, नवीन नियम लागू करायचा असेल तर ते सर्व GR मध्ये दिले जाते. 

Namo shetkari yojana 7th installment GR मध्ये काय दिले आहे?

3 सप्टेंबर 2025 ला नवीन जीआर आला आहे. नवीन GR नुसार नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. 

2023-24 या वर्षापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेद्वारे 6000 रुपये आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेनुसार 6000 रुपये असे शेतकऱ्यांना वार्षिक 12000रुपये मिळत आहेत.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना पहिला ,दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हप्ता देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता 2 सप्टेंबरला दिला गेला आहे. त्यानुसारच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता दिला जाणार आहे. त्यासाठीच 1932.72 कोटी इतका निधी  जाहीर करण्यात आला आहे. 7व्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे तो जाहीर झाला, आहे परंतु कोणत्या तारखेला पैसे मिळतील हे जाहीर झालेले नाही. लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील.

Namo shetkari yojana 7th installment  मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना

  1. शेतकऱ्यांनी ई-KYC पूर्ण केली आहे की नाही हे पाहून घ्यावे.
  2. जमिनीचे कागदपत्रे सातबारा उतारा बरोबर आहे की नाही ते पहावे.
  3. शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेची लिंक झालेले आहे की नाही ते चेक करून घ्यावे.

यामधील कोणतीही माहिती अपूर्ण असेल तर तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन संपर्क साधू शकता. म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळेल.

अधिक माहितीसाठी https://nsmny.mahait.org/ ही सरकारी वेबसाईट चेक करू शकता.

Leave a Comment

Index